माधव पवार
धर्माबाद तालुक्यातील ते येताळा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दि.२९ मे रोजी दुपारी मोटरसायकलला धडक दिल्याने एक जागीच ठार झाला तर एक एक गंभीर जखमी झाला आहे या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात अपघात होत असुन वाहन चालकांनी काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे
धर्माबाद येथून विळगाव गावाकडे मोटर सायकल क्रमांक एम एच २६ ए व्ही ९१३६ या वाहनाने लग्न करून जात असताना अज्ञात वाहनाने धर्माबाद ते येताळा गोकुळ ढाबा जवळ मोटर सायकलला जब्बर धडक दिल्याने मारोती भुमन्ना सोमठाने वय ४० रहाणार विळेगाव हा जागीच ठार झाला तर मारोती माधवराव पप्पुलवार वय ४० राहणार विळेगाव हा गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविण्यात आले आहे
मयत मारोती सोमठाने यांचा शवविच्छेदन करून त्यांच्या
नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आल्याची मिळत असून सदरील घटनेची माहिती धर्माबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.जी.महाजन, पोलिस जमादार संतोष घोसलवाड यांनी पंचनामा केला असल्याची माहिती आहे
मयत मारोती सोमठाणे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असून यापैकी गंभीर जखमी असलेला मारोती पप्पुलवाड यांना एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून धर्माबाद ते येताळा रस्ता हाय फाय झाला असला तरी ही वाहन धारक बेशिस्तपणे चालवत सदरील घटनेचा तपास धर्माबाद पोलीस करीत आहेत

0 Comments