नांदेड जिल्ह्यामधील मोबाईल मिसिंग मधील १५ लाख अठरा हजार पाचशे रुपयांचे ११० अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले असून सदरची कारवाई सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आल्यामुळे नांदेड पोलीसाचे त्यांच्या कामगिरी बदल कौतुक करण्यात येत आहे
जिल्ह्याची पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड डॉ खंडेराया धरणे भोकर ग्रह उपविभागाचे डॉ अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक डीजी चिखलीकर स्थागु शाखेचे शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सायबर पोलीस उपनिरीक्षक जी बी दळवी सोपान घोरपडे पोलिस अमलदार सुरेश वाघमारे राजेंद्र सिर्टीकर दीपक ओढणे रेश्मा पठाण दावीड पिंडगे काशिनाथ कारखेडे व्यंकटेश सांगळे सायबर क्राईमचे सर्व अधिकारी व कर्मचारी सदरच्या कारवाईत आपली जबाबदारी पार पाडली आहे
येथील उपविभागाचे पथक स्थागु शाखेच्या पथकाने व सायबर सेलचे क्राईमच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यात गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन नांदेड जिल्ह्यातील एकूण ११० अँड्रॉइड मोबाईल मिशिंग त्यांची किंमत पंधरा लाख अठरा हजार पाचशे रुपये असून ते सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्यामुळे नांदेड पोलिसांच्या कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणावरून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायबर क्राईमचे जी बी दळवी यांना आदेशित केल्यामुळे त्यानुसार सायबर सेलचे एक पथक व नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती

0 Comments