Header Ads Widget

घुंगराळ्यासह देगांव येथील ग्रामपंचायतची पोट निवडणूक गावाच्या प्रतिष्ठेची - उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद उद्या निकाल -

        माधव पवार
अख्या नांदेड जिल्ह्यात सह नायगाव तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मौजे घुंगराळा व देगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोटनिवडणुकीचे शांततेत मतदान पार पडले आहे
या मतदानाच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या आदेशानुसार फौजदार संजय अटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देगाव बिटचे जेमादार गिते पोहेका तांबोळी पॉका ईश्वरे यांनी कडे कोठ बंदोबस्त ठेवला होता
नायगाव तालुक्यातील मौजे येथे घुंगराळा व देगाव येथे मतदान केंद्राच्या परिसरात गैरकायद्याची मंडळी व रिकामे लोकांची गर्दी जमू नये म्हणून प्रतिबंधक कायद्यानुसार आदेश जारी करण्यात आला होता सदरची निवडणूक गाव गाड्यांची असल्यामुळे व गावाच्या पुढाऱ्याच्या प्रतिष्ठेची असल्याने मतदान हे झाडून करण्यात आले असले तरी घुंगराळा येथे बिट जेमादार संतोष कुमरे एएसआय निकम ए एस आय पोलेजेमादार कंधारे जीप चालक रामेश्वर पाटील आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये एका जागेसाठी मतदान घेण्यात आले तर देगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन जागेसाठी मतदान शांततेत  पार पडले या दोन्ही गावां मध्ये मतदारांनी लोकशाही मार्गाने आपापल्या मतदानाचा हक्क बजावला असून पार्टी प्रमुख सुद्धा आपआपल्या पद्धतीने मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला सदरच्या निवडणूकी दरम्यान कुठे ही गडबड व गोंधळ झाला नसल्याचे व्रत आहेतालुक्यातील आलूवडगाव अंचोली काहाळा बु येथील ग्रामपंचायतची पोटनिवडणूक बिनविरोध काढण्यात आली असल्यामुळे घुंगराळा एक जागेसाठी तर देगाव येथे दोन जागेसाठी शांततेत मतदान पार पडले आहे

घुंगराळा येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये सदरच्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण मतदान ७३७ पैकी ६३७ झाले यात स्त्री ३१२ तर पुरुष ३२५ एकूण टक्केवारी ८६.४३ टक्के मतदान झाले या ठिकाणी प्रोसिडिंग अधिकारी म्हणून जे बी तांबोळी मतदानाधिकारी म्हणून एन डी साबणे मतदान अधिकारी म्हणून पी व्ही जोगदंड मतदान अधिकारी म्हणून एन सी टोम्पे होते तर शासकीय जीप चालक गोपाळराव कोंडेकर हे यंत्रेने सोबत होते

देगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोट निवडणुकीतील वार्ड क्रमांक दोन ७८१ मतदाना पैकी ५८१ झाले यात पुरुष ३०४ तर महिला २७७ यांची टक्केवारी ७४ टक्के तर वार्ड क्रमांक तीन एकूण मतदान ४७१ पैकी ३२१ झाले तर महिला १५६ आणि पुरुष १६५ यांची सरासरी टक्केवारी ७०% झाली असल्याचे असल्याचे ऑनलाईन व्रत आहे 








Post a Comment

0 Comments