नांदेड जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढाऱ्याचे लक्ष लागून असलेल्या नायगावची कृषी उत्पन्न बाजार समिती व कुंटूर मार्केट कमीच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर आता या दोन्ही ठिकाणचे सभापती कोण ? असा प्रश्न जरी पडला असला तरी कुंटूर मार्केट कमीच्या सभापतीची व उपसभापतीची निवड दिनांक २१ मे तर नायगाव येथील २२ मे २०२३ रोजी निवड होणार आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण हे नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी सभापतीचे डिसिजन घेऊ शकतात असे वास्तव चित्र पाहवयास मिळत असले तरी सभापती म्हणून श्रीनिवास पाटील चव्हाण तर उपसभापती म्हणून मा. शिवराज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या विद्यमान खुर्चीचा सभापती म्हणून दाजी आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी की भाऊ रुपेश देशमुख कुंटूरकर असा प्रश्न जनतेला भेडसावत ? असला आहे
सदरचे कोडे सोडविण्यासाठी राजेश देशमुख कुंटूरकर यांनी महत्वाचे डिसिजन घेतील अशी अपेक्षा नागरिकांनी केली असली तरी सभापती म्हणून आंबादासराव धर्माधिकारी दावेदार आहेत तर उपसभापती म्हणून मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांची एकमेव चर्चा आहे
नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे १२ तर भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी भाजपाच्या एकूण ६ जागा बिनविरोध काढल्या तर कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीत बरबड्याचे विद्यमान माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्यासह प्रचार्य मनोहर पवार यांचे मोठे योगदान आहे

0 Comments