Header Ads Widget

ना.गडकरींच्या कार्यक्रमात भाजप मधिल तीन गट आमने सामने शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा राजकीय नाट्य चांगलेच रंगले ? -

श्रीक्षेञ माहूर - हिमायतनगर : नागोराव शिंदे :- 

ना. नितीन गडकरी यांनी दिनांक २० मे २० २3 रोजी विकास कामाच्या भूमिपूजनासाठी माहुर गडावर दौरा केला त्या नंतर झालेल्या सभेत व स्थानिक विश्रामगृहावर स्थानिक भाजपाच्या तीन गटातील समर्थकांत चांगलेच खटके उडाल्याने भाजपाच्या शिस्तबद्ध पक्षात माहूर मध्ये देशपातळी वरील नेत्या समोर शाब्दिक चकमक झाली असल्यामुळे कामाचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

स्काय वॉक या महत्वकांशी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिनांक २० में रोजी माहूर येथे आले होते 

या कार्यक्रमाच्या मंचावर माहूर विधानसभेतील फाउंडर मेंबर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधाकर भोयर, अशोक पाटील सूर्यवंशी, संध्याताई राठोड यांना स्थान मिळाले नाही.मंचावर स्थान तर सोडा विश्रामगृहावर अथवा मंदिरावर गडकरी साहेबांना त्यांना भेटता येऊ नये म्हणून भाजपाच्या काही गटाने स्पेशल व्यवस्था केली आहे

सकाळी ८:३० वा पासून ते दुपारी १२ वाजे पर्यंत आपल्या नेत्याची भेट व्हावी म्हणून तत्काळत असलेले नेते पैकी एका महिला नेत्यांनी माहूर शहरातील पक्षाच्या एका पदाधिकार्‍याला विश्रामगृहावर चांगलेच सुनवल्याची चर्चा आहे 
या महिला नेत्यांनी चांगुलपणाच्या गोष्टी, चापलुसी पणा सोडून द्या, असा दम सुद्धा त्या शहर पदाधिकार्‍याला भरला असल्याचे बोलले जात असून पक्षाने मोठी जबाबदारी टाकल्याने किनवट माहूर विधानसभा मतदार संघात मागील एक महिन्यापासून संघटनाच्या कामात व्यस्त होते 

डाॅ.अशोक पाटील सूर्यवंशी यांनी मानापमानाच्या या नाट्यामुळे सभा स्थळी येण्याचे टाळले. तर संघाच्या तालमीत वाढलेले सुधाकर भोयर यांनी पक्षाची व नेत्याची बदनामी होऊ नये म्हणून, सॉफ्ट कॉर्नर घेत सामान्य नागरिकाप्रमाणे सभा स्थळी उपस्थित राहून नंतर विश्रामगृहावर ना. नितीन गडकरी यांच्या भेटीचा योग साधला आहे

विशेष म्हणजे विद्यमान आमदार , खासदारांना १२० बाय २०५० चौरस सेंटीमीटरच्या पेंडॉलमधील हजार पंधराशे खुर्च्या सुद्धा नागरिकांच्या उपस्थितीने भरता आले नसल्यामुळे सभास्थळी रिकाम्या खुर्च्याची सुद्धा चर्चा झाली मोठया प्रमाणात रंगायला लागली आहे
इतक्यावरच हा विषय थांबला नसून विदर्भातील एका माजी मंत्र्याने कमी प्रमाणात पब्लिक बघून सभेची जवाबदारी असलेल्या आयोजकांना चांगलेच खडे बोल सुनावले अशी सुद्धा चर्चा होती.

किनवट माहूर विधानसभा मधील भाजपची गट बाजी नवीन नसून २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक पासूनच हे सगळं चव्हाट्यावर आल असून आता मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या स्वागताच्या बॅनर वर प्रदेश कार्यकारणीतील प्रमुख तीन स्थानिक नेत्यांना जागा नसल्याने व मंचावरील प्रमुख उपस्थितीच्या नावामध्ये सुद्धा यांची नावे डावल्या गेल्याने तिन्ही गटातील समर्थक चांगलेच संतापले होते

एका समर्थकाने तर माहूरच्या शहराध्यक्ष सोबत झटापट सुद्धा केल्याची चर्चा असून सुसंस्कार सुसंस्कृत पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपा मधील स्थानिक राजकारण " तू बडा की मै बडा " या नाट्यमय राजकीय कलकी तुऱ्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे


Post a Comment

0 Comments