Header Ads Widget

कर्नाटक विजयाचा सोमठाण्यात प्राचार्य मनोहर पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्या कडून जल्लोष

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे कर्नाटक राज्यातील विधानसभा निवाडणुकीत काँग्रेस पक्षाला निर्विवाद जनतेनी व मतदारांनी बहुमत मिळवून दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष-अनुसुचीत जाती काँग्रेस कमिटी नांदेड प्रा मनोहर पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्या कडून दिनांक १३ मे २०२३ रोजी फाटक्याची अतिशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे 

नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यात सुद्धा ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला त्याच बरोबर सोमठाणा येथे ही फटाके व गुलालाची उधळण करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे

कर्नाटकातील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव व  काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्या होमपीच वरील लोकांचे प्रेम यामुळे झाल्याची प्रतिक्रिया प्रा.मनोहर पवार जिल्हाध्यक्ष अनुसुचीत जाती काँग्रेस कमिटी नांदेड  यांनी दिली आहे

कर्नाटकातील जनता व मतदार विशेषत मुस्लीम वा दलित मतदार काँग्रेसच्या बाजुने खंबीर होता हे स्पष्ट झाले असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्टार प्रचारक म्हणून सिमावर्ती मतदार संघातील केलेला प्रचार खूप प्रभावी ठरला यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत चैतन्य आले असल्याचे ही प्रा.मनोहर पवार यांनी म्हटले आहे

Post a Comment

0 Comments