माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे मांजरमच्या जिल्हा परिषद हायस्कूलचा माजी विद्यार्थी अभि दत्ता फुगारे हा त्यांच्या शालेय जिवनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन बाल कलावंत नामांकित झाला होता असे सांगण्यात येत आहे
त्या नंतर काॅलेजचे शिक्षण घेत असताना त्याच्या कुटुंबाच्या जिवनाचा जरा मार्गच बदलला त्याच्या आईचे निधन झाल्याच्या नंतर अभिच्या घरातील आर्थिक परिस्थिती बरोबर अन्य कारणामुळे अतिशय खालावली असताना सुद्धा परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाचा गाडा ओढण्यासाठी अभि फुगारे प्रयत्न करीत होता
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथील रहिवासी असलेले अभी फुगारे यांचे वडील कुठे तरी खाजगी शेत मालकाकडे सालगडी म्हणून काम करत होते आणि त्यांचा भाऊ शिक्षण घेत असल्यामुळे आधीच्या फुगारे कुटुंबियाला त्यांची परिस्थिती अनेक समस्यांनी छेळली जात होती आपल्या घरची परिस्थिती हळूहळू सुधारण्यासाठी अभि ने मांजरम येथील एका शासनमान्य असलेल्या देशी दारू विक्रीच्या दुकानात नोकरी करण्यास सुरुवात केली होती
मांजरम येथील फुगारे यांनी कोलंबी ते मांजरमकडे मोटार सायकल वरून येत असताना एका भरधाव टिप्परला धडक लागल्यामुळे तो जखमी झाला होता
मांजरमच्या युवकानी नांदेड येथील दवाखान्यात दाखल केले परंतु डाॅक्टरानी ने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले २५ वर्षांचा असलेला अभिचे अपघाती निधन झाले हे गावकऱ्यांना कळताच गावावर शोककळा पसरली होती
मानव जीवन हे काचेच्या भांड्या प्रमाणे असल्याचे गावकऱ्यातुन बोलल्या जात असले तरी या कुटूंबातील लोकांना राजकीय पुढाऱ्यासह प्रशासनाने आर्थिक मदत केल्यास सदरील कुटुंबाची परिस्थिती हळूहळू सुधरेल यांचा विचार कुठे तरी झाला पाहिजे असे अनेकांचे मत आहे
मांजरम येथे दिनांक १२ मे २०२३ रोजी सायंकाळी शिवस्मारकच्या पवित्र ठिकाणी अभि फुगारे यांच्या मित्र परीवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून यावेळी शकडो नागरिक उपस्थित होते

0 Comments