Header Ads Widget

चाभरेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम बांधवांचा बीआरएस पक्षात प्रवेश


विशेष प्रतिनिधी / नागोराव शिंदे 

हदगाव हिमायतनगर तालुक्यात भारत राष्ट्र पार्टीच्या तेलंगणा मॉडेल ची सुरवात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून सुरू करण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे नेते म्हणून गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या नेतृत्वात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकीत हिमायतनगर शहरात गुलाबी झेंडा फडकवण्याचे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी केले आहे

बी आर एस पक्षाचे प्रमुख केसीआर राव यांनी गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या प्रवेशानंतर त्यांना ही जबाबदारी दिल्या नंतर त्यांनी आज हिमायतनगर शहरातील अनेक मुस्लिम समाज बांधवांच्या गाठी भेटी घेऊन त्यांचा बीआरएस पक्षात प्रवेश करून घेतला आहे

दिनांक १२ मे रोजी गंगाधर पाटील चाभरेकर यांनी हिमायतनगर शहरातील  एका विवाह सोहळ्याला भेट दिल्या नंतर शहरातील मराठा समाज बांधवांच्या गाठीभेटी  घेत त्यांच्याशी चर्चा करून जनसंपर्क वाढविण्यासाठी सुरवात केली असल्याचे चित्र सध्या शहरातील राजकीय समीकरणात पाहायला मिळत आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथील पत्रकार परमेश्वर शिंदे यांच्या मुलाचे नुकतेच दुःखद निधन झाले असल्याची माहिती कळताच राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गंगाधर पाटील चाभरेकर यांनी शिंदे कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करत शहरात असलेल्या विवाह सोहळ्याला सुद्धा त्यांनी भेटी देत शहरातील मराठा समाज बांधवांच्या गाठीभेटी घेत आहे

आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हिमायतनगर शहरातील राजकारणात बहुजनांना स्वतःला स्थापित करण्यासाठी बी.आर. एस पक्षाचे प्रमुख केसीआर राव यांनी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात पहिली सभा घेऊन जिल्ह्यातील मोठमोठ्या नेत्यांना आपल्या गळाशी लावून गेल्या तीन महिन्यात त्यांनी महाराष्ट्रात सभांचा सपाटा लावला आहे
 
आपकी बार किसान सरकारचा " नारा देत महाराष्ट्रातील आगामी नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे त्यांनी तेलंगणाचे मॉडेल नांदेड जिल्ह्यात पुढे घेऊन शेतकऱ्यांची नाडी पकडली आहे

शेतकऱ्यांना आगामी काळात मोफत २४ तास विद्युत पुरवठा,
वार्षिक एकरी दहा हजारांची मदत आणि मुला - मुलीना आणि दलित अल्पसंख्याकांसाठी नव नवीन कल्याणकारी योजना,नियमित पाणी पुरवठा अशा योजना राबविल्यामुळे केसीआर तेलंगणासह महाराष्ट्र लोकप्रिय होत आहेत असे भारत राष्ट्र पक्षाचे गंगाधर पाटील चाभरेकर यांनी हिमायतनगर येथील मराठा समाज बांधवांच्या भेटी दरम्यान बोलताना सांगितले आहे


Post a Comment

0 Comments