जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या दोन मित्राच्या वादात एका मित्रानेच आपल्या मित्राचा खून करून सदरच्या घटनेचा पुरावा नष्ट करण्यासाठी मित्राचे प्रेत एका कॅनल मध्ये फेकून दिले असल्याची घटना भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताटकळवाडी शिवारात घडली असल्याने संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात येते
पीरबुरहान नगर मधील असलेल्या इंदिरानगर परिसराततील रहिवासी असलेले व रंगरंगोटी करणारे दोन मित्र यांच्यात झालेल्या जुन्या वादातून संजय गोविंद आडगूलवाड यांचा त्यांचाच मित्र असलेला प्रकाश नगर तरोडा बु येथील रहिवासी असलेला रतन मधुकर सोनकांबळे हे दोघे जण एकत्र काम करत होते असे सांगण्यात येते आहे
परंतु दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान सोनकांबळे व आडगुलवाड यांनी भोकर येथे चालू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी व चौकशी करण्यासाठी निघाले होते संजय आडगुलवाड यांच्या सोबत चाळीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते आहे
सदरच्या दोन मित्रांनी भोकर कडे जाण्यासाठी मोटर सायकल क्रमांक एम एच २६ सी सी ६९८७ घेऊन निघाले होते भोकर ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या ताटकळवाडी शिवारातील गदा मारोती जवळ थांबले असल्याचे येते आहे
जुन्या वादाच्या झालेल्या कारणावरून रतन सोनकांबळे यांनी संजय आडगूलवाड यांच्या डोक्यात वार केल्यामुळे त्यांचा ह्या घटनेतच मृत्यू झाला असल्यामुळे त्यांचे प्रेतांचा पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचे प्रेत कॅनल मध्ये फेकून दिल्याची घटना घडली असली तरी एका महिन्याच्या नंतर पोलीसानी शोध घेऊन गुन्हा दाखल केला आहे आहे

0 Comments