Header Ads Widget

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांचा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडुरे यांच्या वतीने सत्कार !! ग्रामीण भागात राष्ट्रवादी व काँग्रेस मध्ये दोन गट

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे येथील रहिवासी असलेले 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विद्यमान विश्वानाथ बडुरे यांच्या वतीने नुकत्याच्या पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकी बरोबर ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत वसंत पाटील सुगावे यांनी बाजी मारल्यामुळे सत्कार करण्यात आहेतालुक्यातील घुंगराळा येथे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत वसंत पाटील गटाचे एकूण १३ उमेदवार होते त्या पैकी एक अगोदरच बिन विरोध निवडून आला होता १२ उमेदवार घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या मतपेटीतुन निवडून आले तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोटनिवडणुकीत वार्ड क्रमांक २ मधून त्यांचाच १ उमेदवार विजयी झाला आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांच्या वतीने नवनिर्वाचित विजयी उमेदवाराचा शालश्रीफळ देऊन सत्कार केला आहे

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष हे मित्र पक्ष एकमेकांच्या विचाराने युती टिकून ठेवत राज्यात सत्ता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करीत असताना ग्रामीण भागात का ? राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष मित्र बनण्या ऐवजी दोन गट करून एकमेकाना विरोध करीत असावेत असा प्रश्न चर्चेला जात असला गावच्या प्रतिष्ठेसाठी काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगत आहे 

Post a Comment

0 Comments