Header Ads Widget

घुंगराळा ते बळेगाव रस्त्याच्या तेरा कोटी रुपयांच्या रस्त्याचे काय झाले ? उन्हाळा संपला तरी रस्ता होईना !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणे बेवारस असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन धारकाला व जनसामान्य माणसाला नाहक त्रास होता ना दिसून येत असला तरी विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून तेरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्या तेरा कोठीचे काय ? असा प्रश्न चर्चेला जात आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी ह्या रस्त्याच्या कामासाठी तेरा कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला असल्याचे सांगण्यात येते परंतु प्रतिक्षात तेरा कोटीचा रस्ता उन्हाळा संपत आला तरी अद्याप पूर्ण काम झाला नाही व त्या रस्त्याचे काम ही चालू करण्यात आले नसल्यामुळे जनतेतून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे

तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याच्या कामासाठी आमदार राजेश पवार यांनी मंजूर करून आणले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचा रस्ता करण्यासाठी का ? चालढकल करत आहेत असा ही प्रश्न जनसामान्य माणसातून केला जात आहे

उन्हाळ्याचा शेवटचा महिना म्हणजे मे महिना या महिन्यात सदरच्या रस्त्याचे काम होईल असे जनतेला अपेक्षा वाटली होती परंतु सदरचे काम अद्याप केले नसल्यामुळे हा रस्ता होणार की नाही असा ही प्रश्न जनसामान्य माणसातून केला जात आहे 

घुंगराळा ते बळेगाव रस्त्याच्या तेरा कोटी रुपयांच्या रस्त्याचे काय झाले ? उन्हाळा संपला तरी रस्ता होताना दिसून येत नसल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचे काय ? असा प्रश्न चर्चेला जात आहे 

Post a Comment

0 Comments