नांदेड जिल्ह्याच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मतदार संघातील जनतेच्या असलेल्या अडीअडचणी व समस्यावर निवारण करण्यासाठी विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर व शहरात जनतेसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे
देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन माजी आमदार दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराच्या प्रजा दरबारात या मतदार संघातील जनसामान्य माणसाचे व शेतकऱ्यांचे तसेच महिला वर्गांचे प्रश्न प्रशासकीय यंत्रणे कडून काही अडचणी भासत असल्यास त्यांचे अधिकाऱ्या समोर समस्याचे निवारण केले आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जन सामान्यासह जनतेच्या समस्या जाणून घेणे हे विद्यमान आमदारांचे काम असते त्या नुसार सदरच्या आमदाराने जनता दरबाराच्या विशेष दरबारा मध्ये अनेक समस्या जाणून घेतल्या आहेत
बिलोली देगलूर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन माजी आमदार स्व.रावसाहेब अंतापूरकर हे विद्यमान आमदार जितेश अंतापुरकर यांच्या वडिलांनी दिलेल्या वचनानुसार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून मी जनतेच्या समस्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ही आमदारांनी सांगितले अशी चर्चा आहे

0 Comments