Header Ads Widget

अटकळीत क्षुल्लक कारणाच्या वादातून दहशत निर्माण करणाऱ्याच्या विरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - सपोनि संकेत दिघे यांची माहिती !!


माधव पवार / मधुकर जवळे :-:-

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे अटकळी येथे दोन युवकात झालेल्या क्षुल्लक कारणा वरून झालेल्या भांडणात अटकळीच्या एकावर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिघे यांनी दिली आहे

तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे आटकळी येथील रहिवासी असलेल्या दोन युवकात म्हणजे ज्ञानेश्वर संजय पोलकवाड व याच गावातील रुपेश शेरे यांच्यात झालेल्या वादात पोलकवाड या तरुणाने हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिनांक १६ मे २०२३ रोजी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे 

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी सदरचे अटकळी प्रकरणी मोठया थंड दिमाकाने हाताळले असले तरी सदरच्या प्रकरणात गावातील सुज्ञान नागरिकानी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु या प्रकरणातील आरोपीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकाना अरे रावीची भाषा करून चाकूचा धाक ? दाखवून गावात अशांतता निर्माण करणाऱ्याच्या दोघां भावंडाच्या विरोधात दिलेल्या तक्रारी वरून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

अटकळी येथील रहिवासी ज्ञानेश्वर संजय पोलकवाड व त्यांचा भाऊ रामेश्वर संजय पोलकवाड या दोन्ही भावंडाच्या विरोधात ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास बिट जेमादार शिवशंकर शिंदे हे करीत असल्याची माहिती सपोनि संकेत दिघे यांनी दिली आहे 




Post a Comment

0 Comments