नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या व नायगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या मौजे घुंगराळा येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यासह कल्याण टोलनाक्याच्या यंत्रणेने या गावात बस स्टँड बांधले नसल्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवाशांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाट पाहावी लागत आहे
तालुक्यातील घुंगराळा गाव हे तीन राज्याशी निगडीत असताना सुद्धा सदरील यंत्रणेच्या गच्छाळ कारभारामुळे या राज्य महामार्वगावर प्रवाशासाठी बस स्टॅन्डची व्यवस्था करण्यात आली केली नाही घुंगराळा गावातूनच आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू राज्यात जाण्यासाठी प्रवाशाना सोपा आहे
या मोठ्या प्रमाणात वर्दळ प्रवाशाची असते या महत्त्वाच्याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव व कल्याण टोल नाका यंत्रनेने सदरची सुविधा केली नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहेकल्याण टोलनाका व संबंधित विभागाच्या बेजबाबदार पणामुळे बस स्टॅन्ड बांधले नसल्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात व कडाक्याच्या उन्हाळ्यात या दोन्ही ऋतूचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागासह कल्याण टोल नाक्याच्या हलगर्जीपणामुळे घुंगराळा येथे बस स्टॅन्ड बांधले नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय रखरखत्या उन्हात होत असून उन्हाच्या चटक्याने प्रवासी घायाळ होताना दिसत आहेत

0 Comments