Header Ads Widget

पोलीस अधीक्षकाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या धडाकेबाज कारवाईत गावठी कट्टा अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुस व एक आरोपी एलसीबीच्या ताब्यात - एक लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त -

               माधव पवार
पोलीस अधीक्षकाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या धडाकेबाज कारवाईत गावठी कट्टा अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुस व एक आरोपी एलसीबीच्या ताब्यात आले असून नांदेड जिल्हयात फायरींगचे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलिसांनी सावधानता बाळगून गस्त मारून  आरोपीचा शोध घेतला त्या पेट्रोलिंग दरम्यान अग्निशस्त्र जप्त करण्याचा आदेश जिल्हाचे पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी आदेश दिला होता

जिल्हयातील स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी पेट्रोलींग व आरोपी शोध मोहीम जोरदार चालू केली असून दिनांक १२ मे २०२३ एल सी बीचे पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांचे आदेशाने सपोनि पांडुरंग माने स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदरील आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना सदरच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली आहे

सदरील घटनेतील आरोपी रवी रमेश हाडसे राहणार त्रिरत्ननगर सांगवी नांदेड हा दिपक नगर पाटी जवळ त्यांनी बाळगलेली गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळताच एका क्षणाचा ही विलंब न करता पथक घटना स्थळी दाखल होऊन आरोपीला जेरबंद केले आहे

सदरची कामगीरी श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दतात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, तानाजी येळगे, देवा चव्हाण, रनधीर राजबंशी यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतूक केले आहे.

सदरील पथकांनी सदरच्या आरोपीच्या मुसक्या आवळून आरोपीच्या नावाची खात्री केली असता त्यांचे नाव रवी रमेश हाडसे वय २८ वर्षे राहणार त्रिरत्ननगर सांगवी नांदेड असे सांगीतले असून त्यांच्या जवळील एक गावठी कट्टा पिस्टल अग्निशस्त्र किंमती ३०.००० रुपये व दोन जिवंत काडतुस किमती २००० हजार रुपये व दोन मोबाईलची किंमत नऊ हजार रुपये असा एकुण एक लाख २२ हजार रुपयाचा मुद्देमाल एल सीबीच्या दमदार कारवाई जप्त करण्यात आहे

गावठी कट्टा हा रवी हडसे यास त्याचा मित्र मनोज ऊर्फ मण्या पि.शंकर पंतगे राहणार जुना मोंढा नवीन पुलाखाली गायत्री मंजरा जवळ गाडीपुरा नांदेड यांनी दिला असून दोन्ही आरोपी विरुध्द पोउपनि  दतात्रय काळे यांनी नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली असल्याचे समजते आहे



Post a Comment

0 Comments