हिमायतनगर येथील तहसील कार्यालयामध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून कार्यरत असलेले निवासी नायब तहसीलदार अनिल तामसकर यांची आणि नायब तहसीलदार विकास राठोड यांच्या बदलीचे आदेश नुकतेच दिनांक २५ मे २०२3 रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाचे सहसचिव श्रीराम यादव यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे
सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन ते चार वर्षापासून हिमायतनगर येथील तहसील कार्यालयामध्ये अहोरात्र नागरिकांच्या समस्यांना तोंड देणारे असे निवासी नायब तहसीलदार अनिल तामसकर यांची हिमायतनगर येथून हादगाव येथे बदली करण्यात आली आहे तर त्याचबरोबर विकास राठोड नायब तहसीलदार हिमायतनगर यांची भोकर येथे बदली झाली आहे
अनिल तामसकर यांच्या जागेवर हदगाव तहसील कार्यालयातून जी डी हराळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसील कार्यालय हिमायतनगर येथून मिळाली आहे

0 Comments