Header Ads Widget

मा.शरद पवार साहेबांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये वसंत पाटील सुगावे यांची प्रतिक्रिया !!

       माधव पवार  / मधुकर जवळे :- 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा पवार साहेबांचा निर्णय आम्हाला मान्य नाही राजकारण व समाजकारण करीत असताना आपल्या छ्त्रछायेखाली आम्ही वाढलो असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब तुमच्या कडून २०% राजकारण आणि ८०℅ समाजकारण हे आम्ही माध्यमातून शिकलो आहोत राजकीय सामाजिक शेती जलसिंचन क्रीडा शिक्षण सहकार,औद्योगिक सांस्कृतिक महिलां विषयक या क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेऊन तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले आहे
महाराष्ट्र हा नेहमीच देशाचा मार्गदर्शक राहिला आहे.. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला आपल्या सारख्या ८२ वर्षाच्या तरुणाची नितांत गरज आहे..आपण जर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असाल तर आम्ही सुद्धा आमच्या पदाचे राजीनामे देवू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब आपण पदापासून निवृत्त होऊन आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही असे परके करू नका साहेब असी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments