Header Ads Widget

वंजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्वच महत्त्वाचे कागदपत्र अज्ञात आरोपीने जाळून टाकले - त्या आरोपीचा शोध घेणार सपोनि महादेव पुरी

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे वंजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी मध्ये रात्री म्हणजे दोन वाजण्याच्या सुमारास शाळेतील सर्वच कपाट फोडून त्यातील अतिशय महत्त्वाची सर्वच कागदपत्रे अज्ञात आरोपीने जाळून टाकल्याची धक्कादायक घटना वंजारवाडी येथे घडली आहे
या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष कुंबरे पोलीस कॉन्स्टेबल अशोक भूमी यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून लवकर आज्ञात आरोपीचा शोध घेतला जाईल अशी पोलिसाची स्पष्ट भूमिका आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या पूर्वी सुद्धा जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथील अशाच पद्धतीचे दिनांक १५ जून २०१६ रोजीच्या मध्यरात्री महत्त्वाचे कागद पत्र अज्ञात आरोपीने जाळून टाकले होते त्या घटनेचा सुद्धा अद्याप तपास व शोध लागला नसल्याने तशाच पद्धतीचा प्रकार जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा वंजारवाडी येथे घडला आहेवंजारवाडी येथील या महत्वाच्या कागद पत्र जळीत प्रकरणी नायगावचे गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे यांच्यासह केंद्रप्रमुख उद्धवराव ढगे कृष्णुर त्याच बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु चे सहशिक्षक बालाजीराव बासटवार यांनी ही सदरील घटनेची पाहणी केली आहे

शाळेचे मुख्यापक जी एन चव्हाण हे तीन दिवसांच्या रजेवर आहेत सहशिक्षक बी एन सोनमनकर एस एच 
सरकंटे व्ही पी जाधव जी डी फुलारी आदी शिक्षक शाळेवर कार्यरत आहेत 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथील सर्व कागदपत्रे अज्ञात आरोपीने जाळून टाकल्यामुळे सदरील आरोपीचा शोध कुंटूर पोलिसांनी तात्काळ घ्यावा अशी मागणी गावकऱ्यातून करण्यात येत असली तरी सदरील घटने प्रकरणी नांदेड येथून फिंगरच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते

सदरची शाळा सन १९६० साली स्थापना करण्यात आली तेव्हा पासूनचे मुळ प्रवेश निर्गम मुळ प्रवेश फॉर्म विध्यार्थीचे हाजरी पट टाचण वही पेपर मुळ टी सी बुक मूल्यमापन रजिस्टर उत्तर पत्रिका शालेय आर्थिक अभिलेख आदी महत्वाचे कागद पत्रे आज्ञात आरोपीने जाळून खाक केले असले तरी सदरील प्रकरणाचा लवकर शोध लागेल अशी अपेक्षा गावकऱ्यानी केली आहे 

Post a Comment

0 Comments