Header Ads Widget

२ कोठीची रुपयाची योजना २ महिन्या पासून गाववासियांना पाणी मिळेना शासनासह एजन्सी हलगर्जीपणा तात्काळ पाणी द्या : अन्यथा जिल्हा कार्यालया समोर सरपंच महिलेचा घागर मोर्चा काढण्याचा इशारा ?


हिमायतनगर : नागोराव शिंदे : - 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा ग्रामपंचायत कार्यालयांना जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन सुद्धा येथील गाववासीयाना हातात घागरी घेऊन लहान मुलासह महिला वर्गांना कडाकाच्या उन्हात रानोमाळ करावे लागत असल्याचे वास्तव चित्र सदरच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे
प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची पाण्यासाठी बे हाल होत असून पाणी मिळेल का ? पाणी अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून सुद्धा प्रशासन झोपेत का ? सदरचे एजन्सी झोपेत असाही प्रश्न चर्चेला जात असला तरी सदरच्या नागरिकाला तात्काळ पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा जिल्हा कार्यालया समोर गाववासीयासह महिला सरपंच कल्पना शिंदे यांचा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे
हदगाव तालुक्यातील मराठा ग्रामपंचायत कार्यालयाला शासनाचा नागरिकांना मुबलकपाणी मिळावा म्हणून अंदाजे दोन ते पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च झाला असताना सुद्धा या सदरच्या योजनेचे पाणी गाववासीयांना मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे
सदर योजनेच्या अंतर्गत टाकीचे बांधकाम करण्यात आले परंतु ह्या टाकीत पाणीच राहत नसल्याचे नागरिकांनी दावा केला असून सध्याच्या परिस्थितीत अतिशय कडाक्याचा उन्हाळा पडला असल्याने नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत

मनाठा ग्रामपंचायत कार्यालयाचे बोट प्रशासनासह एजन्सीकडे तर गावातील महिलांचे बोट ग्रामपंचायत कार्यालयाकडे गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुर्लक्षणामुळे पाणी मिळत नसल्याची खंत एका महिलेने व्हिडिओच्या माध्यमातून केली तर सदरच्या ग्रामपंचायत कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासोबत चर्चा करून पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा हंडा मोर्चा काढणार आहोतच परंतु गाववासियांच्या वतीने उपोषण करण्याचा ही इशारा व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे 
मुख्यमंत्री पेजल योजना या गावांसाठी सन २०१६ मध्ये मंजूर झाली दहा किलो मीटर अंतरावरील कयाधू नदीवरून गावात पाणी आणले दोन जलकुंभ बांधले एक लाख दशलक्ष घनमीटर क्षमतेचा तर दुसरा ६० हजार दशलक्ष घनमीटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला आहे
अद्याप ही गावातील नळांना पाणी आले नाही गावात पाणी येण्यासाठी सदरची पाईपलाईन अंथरली तिला गळती लागल्याने नळांना पाणीच येत नाही संबंधित एजन्सीला येथील ग्रामपंचायत तर्फे वारंवार सांगण्यात आले आहे

यावर एजन्सीने लक्ष दिले नाही या संदर्भात बारा एप्रिल रोजी नांदेडला बैठक घेण्यात आली होती काम पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते गावच्या महिला सरपंच कल्पना शिंदे यांनी गावातील योजनेचे पाणी आले नाही तर १ मे २०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा देखील दिला असून भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे

 


Post a Comment

0 Comments