महाराष्ट्रातील गरजू बेरोजगार युवक व युवतींना मोठया प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे नामदार मंत्री श्रीमंगल प्रभात लोढा यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावे आयोजीत करण्याचा निर्णय घेतला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने आमदार राजेश पवार साहेब आमदार नायगाव यांच्या विशेष प्रयत्नाने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले आहे
नायगाव येथे सकाळी नऊ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आला असून या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्यने युवक युवती यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
सदरच्या मेळाव्याचे नेतृत्व आ. राजेश पवार करणार आहेत
नामांकित उद्योग/कंपन्यामध्ये नोकरीची संधी कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण स्टार्टअप व उद्योजकता साठी मार्गदर्शन अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी
बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे

0 Comments