Header Ads Widget

कार्यकर्त्यामुळे नेता की नेत्यामुळे कार्यकर्ता ? - नेता आणि कार्यकर्ता दोघांनी ही समजून घेण्याची गरज भासते का ?-

        माधव पवार
राज्यातले राजकारण असो की ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो या राज्यात अनेक पक्षांची नेते मंडळी आहेत व कार्यकर्ते सुद्धा आहेत परंतु कार्यकर्त्यामुळे नेता की नेत्यामुळे कार्यकर्ता हे तमाम विविध पक्षातील कार्यकर्त्यांना व नेत्यांना जाणून घेण्याची वेळ सध्या तरी आली असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे भाजपा पक्ष वंचित बहुजन आघाडी असे विविध नामांकित पक्ष या राज्यात राजकीय पक्ष असताना सुद्धा नेता कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेत नाही का कार्यकर्ते नेत्याची बाजू समजून घेत नाहीत असा ही प्रश्न ग्रामीण भागात चर्चेला जात असताना दिसून येत असला तरी निवडणुका लागल्याच्या नंतरच खरी तर नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण येते का असाही प्रश्न चर्चेला जात आहे

या राज्यातला नेता असो की कार्यकर्ता निवडून गेल्याच्या नंतर नेत्याची सर्व ताकद त्यांच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असते परंतु निवडणुका संपल्या की मात्र नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण का ? भासत नाही व कार्यकर्त्यांची जाणीव का होत नाही असे अनेक प्रश्न शहरी भागासह ग्रामीण भागात चर्चाला जात असतात आणि नेते मंडळीला त्यांच्या कार्यकर्त्यांशी जवळीकता कळत नसेल तर कार्यकर्त्यांनी तरी काय करावे असा प्रश्न चर्चेला जात असला तरी कार्यकर्त्यांनी तरी आपल्या नेत्यांना समजून घेण्याची गरज भासत आहे 

Post a Comment

0 Comments