नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नरसी ते उमरी सावरखेड मार्गे दिनांक १ मे २०२३ रोजी बसू करण्यात येत असल्याची माहिती बाबुराव तोडे यांनी जागोजागी बॅनर लावून सदरची माहिती दिली आहे
बिलोली राज्य परिवहन मंडळाची बस वाहतूक निरीक्षक विशाल भगवानराव निवंडगे यांनी सदरची दखल घेऊन सायंकाळी ५ वाजता घुंगराळा येथे बसचे आगमन होईल अशा पद्धतीने सोडणार असली तरी ही बस प्रवासाठी अतिशय महत्वाची ठरणार असल्यामुळे दिवसातून दोन वेळा सकाळी ७ वाजता सुटणार आहे
सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे अंतरगावकर यांनी जागोजागी बॅनर झळकविले असून ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी सदरची बस सेवा माजी आमदार पुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अगर प्रमुखांशी चर्चा करून सदरची बस चालू करण्यासाठी राजे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याने हिरवा कंदील दाखविला आहे
आंतरगावचे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे यांनी सांगितले सदरची बस या मार्गावर पूर्वीही चालू होती परंतु काही कारणास्तव व काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची बस बंद करण्यात आली होती परंतु सदरची बस पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी मोठे प्रयत्न केले आहे
प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला व चव्हाणाच्या विनंतीचा सन्मान करून राज्य परिवहन महामंडळाचे बिलोली अगरचे वाहतूक निरीक्षक विशाल निवंडगे यांनी बस चालू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती बाबुराव तोडे यांनी दिली आहे
सदरची राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक यांचे स्वागत करण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी घुंगराळा सावरखेड आंतरगाव मनूर इज्जतगाव बळेगाव तळेगाव उमरी या ठिकाणी बाबुराव तोडे यांनी मोठ मोठाले बॅनर झळकविले आहे

0 Comments