Header Ads Widget

घुंगराळा येथे एका जागेसाठी होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी अपक्ष वाल्याची ही तयारी ? -

          माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वार्ड क्रमांक दोन मध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्यामुळे सदरची निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष वाल्यांची ही मोठी तयारी असल्याची चर्चा होत आहे

घुंगराळा येथील एका जागेसाठी पोट निवडणूक काही आठवड्यात होत असून अपक्ष ही फॉर्म दाखल करण्यात येथील अशी चर्चा ऐकावयास मिळत असून सदरची निवडणूक ही दोन गटात रंगणार असली तरी या सदरच्या पोट निवडणुकी मध्ये अपक्ष वाल्याची आडवी दांडी पडणार असल्याची शक्यता ? नाकारता येत नाही 

तालुक्यातील घुंगराळा येथे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही लागली असल्यामुळे त्याच बरोबर ग्रामपंचायत कार्यालय वार्ड क्रमांक दोन मध्ये ओबीसी महिलांसाठी जागा राखीव असल्यामुळे या ठिकाणी अपक्ष फॉर्म दाखल करण्यासाठी बऱ्याच जणांची उत्सुकता असल्याचे चित्र व चर्चा पाहवयास व ऐकावयास मिळत आहे

घुंगराळा येथे राजकीय दोन गट मजबूत असल्यामुळे सदरच्या निवडणुका लढण्यासाठी दोन्ही गटाची तयारी असली तरी ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी ओबीसी महिला राखीव असलेल्या वार्ड क्रमांक दोन मध्ये अपक्ष फॉर्म दाखल करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे ही अधून मधून चर्चेला उधान येत असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे 



Post a Comment

0 Comments