नायगाव सह कुंटूरची मार्केट कमिटी राजकीय पुढाऱ्याने आपापले उमेदवार तयार करून सदरची निवडणूक शर्तीने खिंड लढवल्या प्रमाणे सदरची मार्केट कमिटीची निवडणूक लढविणार का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे
सदरची निवडणूक लढविण्यासाठी वरिष्ठ पातळीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जंग पछाडली जाणार की नाही असा ही जनसामान्य माणसातून प्रश्न निर्माण झालेला असला तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी ही सदरच्या निवडणुकी कडे लक्ष दिले की काय ? असे दिसते आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी ही माजी मंत्री तथा मा. स्व.खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे पुत्र राजेश कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा लढविली जाते
सदरची मार्केट कमिटी ही इतर मार्केट कमिटीपेक्षा वेगळी असून त्याच पद्धतीने नायगावची मार्केट कमिटी सुद्धा मोठी असल्यामुळे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाते ह्या दोन्ही मार्केट कमिटीवर जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे लक्ष नेहमी लागून असते
तालुक्यातील नायगाव मार्केट कमिटीसह कुंटूरच्या मार्केट कमिटीकडे सुद्धा जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सूचनेनुसार माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचे ही लक्ष प्रमुख्याने राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे
सदरच्या मार्केट कमिटीच्या निवडणुका गरम पद्धतीने चालणार का थंड पद्धतीनेच चालणार अद्याप तरी अंदाज लागत नसल्यामुळे सत्तरच्या मार्केट कमिटीच्या निवडणुका जोर मार दो जोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ही चित्र दिसते आहे

0 Comments