Header Ads Widget

कै.प्रदीप धोंडिबा पाटील यांच्या "गावतिढा" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा व द्वितीय पुण्यस्मरण

        बाळासाहेब पांडे :-
सुप्रसिध्द कादंबरीकर कै. प्रदीप धोंडिबा पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या "गावतिढा" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कामरसपल्ली ता.बिलोली येथील हनुमान मंदिर मैदानात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिपक पाटील कामरसपल्गालीकर आणि गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
           
 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा खा.भास्कररावजी पाटील खतगांवकर हे आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण हे राहणार आहेत तर "गावतिढा" या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, सुप्रसिध्द साहित्यिक डॉ.जगदीश कदम, प्रकाशक सुनिताराजे पवार,प्रा. ऋषीकेश देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रसिध्द कवी महेश मोरे,साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार, साहित्यिक  प्रभाकर पवार,लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक दिगांबर कदम ,प्रसिध्द कथाकार विजय जाधव,लेखकाचे वडील धोंडिबा पाटील कामरसपल्लीकर
विशेष उपस्थिती साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब पाटील खतगांवकर, माजी उपसभापती तथा प्राचार्य संजय पाटील शेळगांवकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे राहाणार आहेत
        
संयोजक म्हणून प्रा. नागोराव उतकर, प्रा. व्यंकटेश सोळंके, पांडूरंग पुठ्ठेवाड, लक्ष्मण मलगिरवार, बालाजी पेटेकर, शंकर राठोड, ज्ञानेश्वर शिंदे गागलेगांवकर, सोपान देगांवकर, प्रा.वा.ल. श्रीमंगले, गजानन पा. पवार होटाळकर, व्यंकट आनेराये, डॉ. बाळु दुगडूमवार, पंडित पाटील, अमृत तेलंग, विरभद्र मिरेवाड व नायगांव,नरसी ,शंकरनगर येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.
       
सुप्रसिध्द कादंबरीकर कै. प्रदीप धोंडिबा पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या "गावतिढा" या कादंबरीचा प्रकाशन सोहळ्याला परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिपक पाटील, संदीप पाटील रातोळीकर, विजय पाटील भोपाळकर, हेमंत पाटील, ऋषीकेश पाटील, ऋतुराज पाटील, कु.ऋतूजा पाटील, हर्षवर्धन पाटील समस्त पाटील परिवार व समस्त गावकरी मंडळी कामरसपल्ली यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments