Header Ads Widget

ग्रामसेवक संघटनेच्या वतिने सेवानिवृत्त ग्रामसेवकाचा सेवापूर्ती भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन - अध्यक्ष टी जी रातोळीकर यांची माहिती

       माधव पवार
ग्रामसेवक संघटनेच्या वतिने सेवानिवृत्त ग्रामसेवकाचा  सेवापूर्ती भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन - अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी दिली असून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन भव्य करण्यात आले असल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष मान्य वरांची उपस्थिती लाभणार आहे 

नायगाव पंचायत समितीच्या अंतर्गत येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ ग्रामसेवक यु आर भागानगरे ग्रामसेवक श्र एम एन. बंडे व ग्रामसेवक पी. पी. नेरलेवाड हे नियत वयोमाना नुसार तथा शासकीय सेवेचा कार्यकाळ संपल्यामुळे सेवानिवृत झालेले आहेत

त्यामुळे त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे दिनांक ३ एप्रिल २०२३ /रोजी सकाळी १०.३० वाजता कै.बळवंतराव चव्हाण सभाग्राहात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्याक्ष टी जी रातोळीकर यांनी सांगितले आहे

सेवा सेवापूर्ती भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय पाटील वडजे जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना नांदेड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एल आर वाजे गटविकास अधिकारी पं स नायगाव यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडणार आहे 

प्रमुख उपस्थिती लतीफ शेख विस्तार अधिकारी , गिरीश कानोडे विस्तार अधिकारी महेश मुखेडकर विस्तार अधिकारी , गोणेवार शाखा अभियंता मयुर जिरवणकर शाखा अभियंता इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे


Post a Comment

0 Comments