उमरी तालुक्यातील मोजे शिरूर येथील रहिवासी असलेले मयत संतोष अर्जुन डोंगरे या चाळीस वर्षीय तरुणाचे प्रेत नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पांगरी तलावाच्या कडेला सापडले असल्यामुळे त्यांचे नातेवाईक त्याची ओळख पाठविली असल्याची माहिती फौजदार एम डी हंबर्डे यांनी दिली आहे
सदरची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे फौजदार एमडी हंबर्डे घटनास्थळी दाखल होऊन सदरचे प्रेत ताब्यात घेतले असल्याची माहिती फौजदार हंबर्डे यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी फौजदार एमडी हंबर्डे यांना सदरचे प्रेत व पंचनामा करण्यासाठी दिनांक १८ मार्च २०२३ रोजी ८ वाजण्याच्या दरम्यान सदरची माहिती ग्रामीण पोलीस ठाणे नांदेड यांना देण्यात आली होती
सदर प्रेत अनोळखी असल्यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आली असल्याची ही फौजदार हंबर्डे यांनी दिली आहे
विष्णुपुरी जवळील पांगरी तलावात पाण्याच्या कडेला अनोळखी मृत अवस्थेत सापडलेल्या अनोळखी प्रेतांची ओळख पटविण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाणे नांदेड यांच्या वतीने जनतेला आवाहन केले होते
परंतु उमरी तालुक्यातील शिरूर येथील रहिवासी असलेले अनोळखी तरुणाच्या प्रेताची नातेवाईकांनी ओळख पटविल्याने सदरचा ४० वर्षीय तरुण हा शिरूर येथील असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे ही ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष फौजदार एमडी हंबर्डे यांनी दिली आहे

0 Comments