नायगाव तालुक्यातील मौजे रानसुगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे शासनाच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाले आहे
सदरील कामाचे उद्घाटन दिनांक ११ मार्च २०२३ रोजी करण्यासाठी आमदार राजेश पवार यांनी गावचे सरपंच गोविंद लक्ष्मण संग्रपवार महिला उपसरपंच गंगाबाई विलासराव जाधव व सदस्य यांना उदघाटनाची पूर्व कल्पना न देताच उदघाटन करणार ? असल्यामुळे त्या ठिकाणी गावकरी विरोध करणार असल्याचा आरोप उपसरपंच प्रतिनिधी चंद्रशेखर विकासराव जाधव यांनी केला आहेनायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार या लोकप्रतिनिधीच्या हस्ते कामाचे उदघाटन व्हावे ही मनात संकल्पना मनात धरून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विठ्ठलवार यांच्या समवेत सदरच्या कामाचे नारळ फोडण्याच्या तयारीत असल्याचे उपसरपंच प्रतिनिधी चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले आहे
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रानसगाव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अविनाश हळदेवाड यांच्याशी संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती मिळू शकली नाही रानसुगावची ग्रामपंचायत कार्यालय ही छोटी असली तरी या गावचा विकास होणे गरजेचे आहेगावातील नागरिकांना पाणी मुबलक मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाचे ध्येय धोरण असल्याने या गावचे सरपंच गोविंद संग्रपवार व महिला उपसरपंच गंगाबाई जाधव यांच्यासह सदस्याचा विरोध असल्याचे उपसरपंच प्रतिनिधी तथा मा. सेवासहकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे
रानसुगावात उद्घाटन करण्यासाठी कोणतेच ग्रामपंचायतचे नियोजन नसताना ही लोकप्रतिनिधीसह ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नायगाव यांच्या वतीनेच करण्यात येत असल्याचे उपसरपंच प्रतिनिधी यांनी सांगितले आहे

0 Comments