नायगाव तालुक्यातील मांजरम विद्युत वितरण कंपनी युनिट अंतर्गत असलेल्या गोदमगाव येथील नागरिकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी मी मोठे प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता पठाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे
तालुक्यातील गोधमगाव येथे गेल्या काही आठवड्या पासून विद्युत पुरवठा सुरळीत नसला तरी महावितरण कंपनीच्या वतीने ह्या गावासाठी विद्युत वितरणचे ट्रान्सफॉर्मर देण्यात आले आहेत
सदरच्या गावात ग्राहकांनी विद्युत मीटर घेण्यासाठी धजावत नाहीत गावात झिरो वसुली असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही वीज खरेदी करतो आणि ग्राहकांना सवलतीच्या दरात देत आहेविद्युत वितरण कंपनी ही ग्राहकांना उधारी देतो नंतर वसुली करत असताना सुद्धा ग्राहक वीज बिल भरण्यास तयार नाहीत असे ही सहाय्यक अभियंता पठाण यांनी सांगितले आहेराज्यात अगोदर पासूनच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वसुली होत नसल्यामुळे तोट्यात असताना सुद्धा विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असते असे ही पठाण यांनी सांगितले आहे
ग्राहकाकडून वाटेल पद्धतीची अपेक्षा नुसार वसुली होत नसल्यामुळे सदरची विद्युत वितरण कंपनी सध्याच्या परिस्थितीत घाट्यात असल्याचे ही विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मांजरम युनिट पठाण यांनी सांगितले ग्राहकाने घरगुती मीटर घेण्यासाठी लाईन मनास सहकार्य करावे असे ही आवाहन ही सहाय्यक अभियंत्यानी केले आहे

0 Comments