नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील रहिवासी असलेले व प्रतिभा निकेतन हायस्कूलचे श्रीनगर नांदेड चे माजी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ साहित्यिक आनंद गायकवाड यांनी लिहिलेल्या मी एक शिल्पकार या शंभर पाणी आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळा दिनांक ५ मार्च २०२३ रविवार रोजी सकाळी १०.३० वा.देवकृपा मंगल कार्यालय, छत्रपती चौक पावडेवाडी रोड नांदेड येथे संपन्न होणार आहे
प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष मा.आ. वसंतरावजी चव्हाण अध्यक्ष, नां. जि.म.सहकारी बँक नांदेड , शुभहस्ते
डी.पी. सावंत माजी मंत्री उच्च शिक्षण म.रा. सचिव शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड , प्रमुख वक्ते देवीदास फुलारी ज्येष्ठ साहित्यिक नांदेड तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साईनाथ हाडोळे पाटील आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ तथा तांत्रिक संचालक ए. एस. अग्री ॲण्ड ॲक्वॉ एन. एल. टी.ठाणे , विठ्ठल पावडे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड येथील कार्यक्रमाला विशेष मूर्ती लाभणार आहेत
विशेष सत्कारमूर्ती शंतनू डोईफोडे संपादक, दै. प्रजावाणी , प्रा.डॉ. बालाजी कोंपलवार उपाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती , पंढरीनाथ बोकारे संस्थापक अध्यक्ष नानक - साई फाऊंडेशन , दिगु तुमवाड माजी जिल्हाध्यक्ष, शाहिर परिषद जी. नागय्या अध्यक्ष आंध्र समिती तेलगू शिक्षण संस्था नांदेड
दत्ता तुमवाड अध्यक्ष सत्यशोधक समाज प्रतिष्ठान नांदेड आहेत.तर निमंत्रक म्हणून नागोरावजी अंबुलगेकर (माजी तालुका कृषी अधिकारी , निलेश गोपाळचावडीकर सपोनि. , माणिकराव हंगरगे माजी शाखा अधिकारी म.स.बँक. नांदेड राहणार असून मी एक शिल्पकार या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन निर्मलकुमार सूर्यवंशी निर्मल प्रकाशन, कैलासनगर नांदेड यांनी केले आहे.

0 Comments