Header Ads Widget

परीट गाढवाच्या सहाय्याने रेती काढण्याचा परवाना द्या डेबोजी क्रांती दलाची मागणी

   
       मधुकर जवळे
नायगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या अंतर्गत अनेक गावे येतात त्या प्रत्येक गावात परीट समाज आज ही हलाखीचे परिस्थितीत जीवन जगतो आहे

त्या परीट समाजाला त्यांच्या कुटुंबाचा उदर्रनिवाह चालविण्यासाठी कोणताच पर्याय उरला नसल्यामुळे त्यांना गाढवाच्या साह्याने रेती काढण्याची परवानगी देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे

डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी यादवराव ईबितदार यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून सध्याच्या परिस्थितीत शासनाने गोदावरी पात्रातील रेती काढण्यासाठी बंदी घातली असून शासनाने गोरगरीब परीट समाजातील लोकांचा पूर्वी पासून व्यवसाय आहेत 
  
एखादा भांडवलदार यावे आणि शासनाच्या नियमा प्रमाणे पैसे भरावे आणि जेसीबी हायवा टिप्परच्या साह्याने गोदावरी नदी पात्रातील भरमसाठ रेतीचा उपसा करावा असे आज पर्यत चालत आलेले आहे

नायगाव तालुक्यातील प्रत्येक गावात परीट समाज हलाखीचे जीवन जगत आहेत म्हणून त्यांना रोजंदारी मिळण्यासाठी गाढवाच्या साह्याने रेती काढण्याचा परवाना देण्यात यावा अशी मागणी डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी यादवराव ईबीतदार  यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे 

Post a Comment

0 Comments