Header Ads Widget

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची घुंगराळा जिल्हा परिषद हायस्कूलच्या परीक्षा केंद्राला भेट

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथील परीक्षा केंद्राला भेट दिनांक ६ मार्च २०२३ रोजी दिली असता परीक्षा केंद्रावर कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार दिसला नसल्यामुळे जिल्हाधिकारी राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे

तालुक्यातील घुंगराळा जिल्हा परिषद हायस्कूल येथे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन चौकशी केली असता शाळेतील परीक्षा देणारे विद्यार्थी अतिशय शांतपणे व कॉफी मुक्त वातावरणात इंग्रजीचा पेपर दिला असल्यामुळे यावेळी २०५ पैकी २०२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला तर तीन विद्यार्थीची अनुपस्थित होते असे शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांनी सांगितले आहे

जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे परीक्षा सुरळीत असल्यामुळे व कुंटूर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने परीक्षा केंद्राच्या परिसरात शांततेचे वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असले तरी अशा परिस्थिती मध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परीक्षा केंद्रला अचानक भेट दिली आहे

जिल्हाधिकारी राऊत यांच्या निदर्शनास एक ही कॉफी निदर्शनास आली नसल्यामुळे ते समाधान व्यक्त केले व या परीक्षा केंद्राला नायगावचे नायफ तहसीलदार नबलवार यांनी ही भेट दिली आहे

Post a Comment

0 Comments