माधव पवार
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक पनवेल येथील शांतीवन येथे पार पडली या बैठकीसाठी महाराष्ट्रातून चंद्रपूर पासून ते मुंबई पर्यंत चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले आहे
चंद्रपूर जिल्ह्यामधून पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहू शकतात याचाच अर्थ आपली पुरोगामी संघटना आणि आपले पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या अंतिम कोपऱ्यापर्यंत पोहोचले असे समजायला हरकत नाही असे सांगण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाच्या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून विजयजी सूर्यवंशी , त्याचप्रमाणे बिंदवाल अडागळे सर, महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव निलेश ठाकरे, उपाध्यक्ष गोपाळराव लाड, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे त्याचप्रमाणे नाशिकचे जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद आदी उपस्थित होते
नांदेडचे जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर, कार्याध्यक्ष मारोती शिकारे, हदगाव तालुका अध्यक्ष अवधूत खाडे त्याचप्रमाणे चंद्रपूर येथील जिल्हाध्यक्ष आणि संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र सोनारकर तसेच परभणी नांदेड चंद्रपूर नाशिक मुंबई जळगाव या ठिकाणाहून पत्रकार बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आढावा बैठकीमध्ये मागील पाच वर्षाच्या कामाचा आढावा आणि संघाचा ताळेबंद सांगण्यात आला. तसेच पुढील काळात संघाच्या वाढीसाठी काय काय करता येईल याची यथासांग चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र देण्यात आली. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमासाठी मोठ्या उल्हासाने महाराष्ट्रातून पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होत्या सर्वांना बोलण्याची आणि काही सूचना असतील तर त्या मोकळेपणाने सांगण्याची अनुमती यावेळी देण्यात आली होती. त्याप्रमाणे काहींनी संघामध्ये काही बदल काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे
येणाऱ्या काळात आपल्या संघाची वाटचाल, घौडदौड मोठ्या जोमाने चालू आहे. असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. उपस्थितांचे आभार मानले, शेवटी सामुहिक राष्ट्रगीत घेऊन अध्यक्षांनी कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

0 Comments