Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा केला -प्रा. रवींद्र चव्हाण

      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी आमदार पदावर कार्यरत असताना या मतदार संघाच्या विकासासाठी मोठा पाठपुरावा केला आहे

माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बळेगाव बंधाऱ्याचे पाणी कोलंबी भागातील शेतकऱ्यांना मिळावे म्हणून शासन दरबारी  प्रयत्न केले आणि आज बळेगाव बंधाऱ्याचे पाणी कोलंबी पर्यंत जात असल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आहेत

तशाच पद्धतीने नायगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून या मतदार संघाचा विकास व्हावा म्हणून मा. वसंतराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता

या नायगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कामे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे

यात घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता असेल बरबडा ते बरबडा वाडी रस्ता असेल कृष्णुर ते बरबडा मधला मार्ग असेल हा रस्ता गेल्या वर्षी डांबरी करण झाला सदरचा निधी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता

सदरचा पूल ही करण्यात यावा म्हणून पाठपुरावा केला यात काही शंका नसल्याचे ही प्राध्यापक रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments