Header Ads Widget

ब्रिकिंग : न्यूजचा अधिकाऱ्याना दणका : घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याच्या तेरा कोठी रुपयाचे टेंडर अखेर निघाले ? - एक ते दीड महिन्यात काम चालू होणार !!

              माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत होता सदरचा रस्ता दर्जेदार करण्यात यावा म्हणून दैनिक प्रजावाणी सह नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत

राजकीय पुढाऱ्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याच्या संदर्भात अनेक वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या

दिनांक १ मार्च २०२३ रोजी ब्रिकिंग न्यूज म्हणून घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याच्या तेरा कोठी रुपयाचे टेंडर निघण्या अगोदर राजकीय पुढारी उदघाट्नाच्या तयारीत असल्याची ब्रिंकिंग न्यूज टाकताच अखेर टेंडर निघाले ? असल्याची माहिती मिळत असले तरी सदरचे श्रेय कोणाला ? मिळणार आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी गेल्या अनेक महिन्यापासून घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी १३ कोटी रुपयाचा निधी आणला असल्याचे बॅनर लावले होते परंतु या रस्त्याचे अखेर दिनांक १ मार्च २०२३ रोजी टेंडर निघाले असल्याची माहिती ? नायगाव फास्ट न्यूजला मिळाली असल्यामुळे सदरचे व्रत ऑनलाईन प्रकाशित करण्यात येत आहे

तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सुद्धा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून सदरच्या रस्त्याचे काम मार्गी लावू असे सांगितले होते

सदरचा रस्ता हा अनेक दिवसापासून शासन दरबारी बेवारस होता रुई बुद्रुक येथे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमदार राजेश पवार आले असता गावातील काही तरुणानी त्यांना रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले होते त्यावेळी आमदार राजेश पवार यांनी येत्या १५ दिवसात चालू होईल असे त्यांनी सांगितले असल्याचे सांगण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments