नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नायगाव येथे केंद्र शासनच्या आधारभूत चना खरेदी केंद्राचा शुभारंभ बुधवारी दुपारी एक वाजता लालवंडी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात करण्यात आला आहे शुभारंभाच्या दिनी वीस शेतकऱयांना बोलावण्यात आले होते.जवळ पास तीनशे क्विंटल चना खरेदी करण्यात आला.शासनाच्या नियमानुसार 5335 रु प्रति क्विंटल भाव देण्यात आला.
हरभरा खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक सुनील गणलेवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती मोहन पाटील धुपेकर हे होते.
या वेळी मुख्य अतिथी म्हणून वैभव ठाकरे मार्केटिंग व्यवस्थापक दि.विदर्भ कॉ.मार्केटिंग ली ग्रेडर मारोती पनासे कौठेकर सचिव संजय कदमहे होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी माधव कुलकर्णी शेतकरी शिवाजी शिंदे नायगाव गायकवाड सुभाष शिंदे सुभाष नरतावार पपडूजी पत्रकार तानाजी शेळगावकर,शेतकरी गिरीश कुलकर्णी,विठल जांभळे शेख गन्नी आदींची उपस्थिती होती.
या वेळी पहिल्या दिवशी नोंदणीप्रमाणे २० शेतकरी बोलावण्यात आले होते. यातील विठल जांभळे,बळवन्त जांभळे,गणपत मोरे,रंगनाथ कुलकर्णी यानी प्रथम माल आणल्या बद्दल त्यांचा सन्मानकरण्यात आला.बरीच शेतकरी हमाल,व्यापारी मंडळी या वेळीउपस्थिती होती.



0 Comments