Header Ads Widget

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कृष्णुर व घुंगराळा येथे १९७५ साला पासून असलेली बँका नायगावला जोडल्यामुळे शेतकऱ्याची गैरसोय : बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी पूर्वीच्या ठिकाणीच जोडावेत -

       माधव पवार 
राज्यात व ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सध्याच्या परिस्थितीत चांगल्या दर्जाची चालत असल्यामुळे शेतकऱ्यांनी व खातेदारांनी सदरच्या बँकेवर विश्वास संपादन करून या बँकेत खाते उघडले सन १९७५ ते १९७६ साला पासून कृष्णूर व घुंगराळा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यान्वित होती

परंतु मधल्या काळात काही सदरच्या बँकेला अडचणी आल्यामुळे बँकेचा व्यवहार बंद करण्यात आला होता त्यातच घुंगराळा व कृष्णुर बँकेची उचल बांगडी करून नायगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्याचे खाते मोठया प्रमाणात जोडण्यात आली आहे

तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णुर व घुंगराळा हे गावे औद्योगिक वसाहत एमआयडीसी कृष्णूर वसाहत ही मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे या कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना नायगावच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन शेतकऱ्यांना विमा असो की शासकीय अनुदान असो अथवा पंतप्रधान सन्मान योजने अंतर्गत मिळणारे पैसे हे चौकशी करण्यासाठी जावे लागते त्यातच शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

राज्यातल्या सहकार विभागानी तसेच जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींनी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सदरच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कृष्णुर व घुंगराळा येथे परत कार्यान्वित करून दिल्यास शेतकऱ्यांची गैरसोय टळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावर टाकला आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी एक ते दोन महिन्यात सदरील बँकेच्या संदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नायगाव येथे जोडण्यात आलेली जिल्हा मध्यवर्ती बँक ही परत घुंगराळा व कृष्णूर येथे देण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments