घरा समोरील कार जाळली सिसीटिव्हीच्या माध्यमातून झाले उघड ? हदगाव तालुक्यातील वडगाव येथील घटना !
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मौजे वडगाव येथील रहिवासी असलेल्या दलित समाजातील एका व्यक्तीची कार त्यांच्या काकाच्या घरा समोर लावली असताना गावातील एका व्यक्तीनी पेट्रोल पंपावर जाऊन बॉटलमध्ये पेट्रोल आणले सदरच्या कारवर टाकून आग लावली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे
त्या आगीत सदरची कार जळून खाक झाली असल्याची घटना नुकतीच घडली असून सदरचा आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पेट्रोल पंपावरून सदरच्या बाटलीत पेट्रोल आणल्याचे निदर्शनास आल्यावर हादगाव पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कार जळीत प्रकरणातील फिर्यादी प्रभू विश्वनाथ कांबळे वय ४० वर्ष यांनी आरोपी विक्रम प्रकाश राहुलवार यांच्या विरोधात तक्रार दिली असल्यामुळे जळीत कार क्रमांक एम एच १२ डी वाय ९६३६ पेट्रोल टाकून जाळला असल्यामुळे सदरची तक्रार देण्यात आली असल्यामुळे पोलीस तपास करीत असून हा सदरचा व्यक्ती अनेक दिवसा पासून जाणूनबुजून त्रास देत असल्याचे सदरच्या दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे

0 Comments