जागतिक महिला दीना पुरताच महिलाचा सन्मान नको नेहमी देशातील महिलांचा सन्मान केला पाहिजे असे मत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अख्या विश्वातील महिलांना शुभेच्छा देत शिवराज पाटील होटाळकर यांनी म्हणाले असून महिला ह्या पुरुषापेक्षा कमी नसल्यामुळे सरकारने त्यांना सुद्धा ५० टक्के आरक्षण दिले असल्याने सदरच्या महिला पुरुषा बरोबर काम करत असल्याचे ही शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे
जागतिक महिला दीनाची कुणाला सूचली संकल्पना - शिवराज पाटील -
जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना सर्व प्रथम क्लारा झेटकीन या महिलेला सूचली असून त्या अमेरिकेच्या साम्यवादी विचार सरणीच्या कार्यकर्त्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची पिळवणूक कमी करण्यासाठी त्यांना चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार हवा या मागण्यांसाठी त्यांनी मोठी रॅली काढली असल्याचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे
महिला दीनाचे ते वर्ष होतं १९०८ चं. न्यूयॉर्कमध्ये १२ ते १५ हजार महिलांनी मोर्चा काढला होता त्यानंतर एक वर्षाने अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली असल्याचे सांगत ते पुढे सांगितले की त्यानंतर १९११ मध्ये डेन्मार्क स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया जर्मनीत पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला असल्याचे होटाळकरानी सांगितले असून या वर्षी आपण १११ वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत
सन १९७५ साली संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत रितीने ८ मार्च हा महिला दिन साजरा करण्यास मान्यता दिली असल्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड शिवराज पाटील यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
जागतिक महिला दिनाला अनेक देशांमध्ये महिलांना सुटी दिली जाते रशियात हा दिवस अधिक उत्साहाने साजरा केला जातो तर चीन मध्ये अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुटी दिली जाते अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वूमन्स हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो दिनांक ८ मार्च या दिवशी अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करत मानपत्र काढले जाते असे पाटील यांनी सांगितले आहे

0 Comments