असे वादळ येतील किती जातील किती यांची तमा न करता नायगाव मतदार संघाच्या विकासासाठी व कार्यकर्त्यांच्या हट्टापायी दोन पाऊल पुढे जाऊन जनसामान्य माणसाची व शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी माझी तयारी असल्याचे मत माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहेआज पर्यंतच्या राजकारणात असे अनेक वादळ आले मी झेलत गेले जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझ्या माध्यमातून व पक्षांच्या माध्यमातून प्रामाणिक पणे काम करीत असल्याचे ही भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरसिटणी शिवराज पाटील होटाळकर सांगितले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाची आगामी काळातील विधानसभा निवडणूक माझ्या भाजप कार्यकर्त्यांच्या हट्टा पायी व जनतेच्या सेवेसाठी लढविणार असल्याची ही शिवराज पाटील होटळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
भाजपात काम करत असताना पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार व नांदेड जिल्ह्याचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून येणाऱ्या आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो यामध्ये माझे प्रामाणिकपणे काम असणार आहे

0 Comments