येत्या आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये या विभागाचा दर्जेदार विकास करण्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या पाठीमागे खंबीर पणे हुभे रहावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भिसीकर यांनी दिनांक ५ मार्च २०२३ रोजी खंडोबारायाच्या परिसराचा सुसज्ज विकास करण्याच्या संदर्भातील दीड कोटी रुपयांच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले आहे राजकीय नेते मंडळीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी विविध विकास कामे खेचून आणण्यात मला यश मिळाले असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी प्रस्ताविक भाषाणात सांगितले आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सभाग्रहासाठी ५० लाख रुपये मिळाले आहेत तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा दहा लाख रुपाये सरक्षण भिंती साठी दिले असून त्याच बरोबर बिन तारी संदेशच्या कामासाठी ४० लाख रुपये मिळवून दिले जवळ पास दीड कोठी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे वसंत पाटील यांनी सांगितले आहे
घुंगराळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसेकर पुढे म्हणाले की या विभागाचा दर्जेदार विकास करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये मतदाराच्या आशीर्वादाने त्यांना जिल्हा परिषदला पाठवून देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी भोसेकर म्हणाले आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूर होते तर विचार मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर वसंत पाटील सुगावे सुभाषराव गायकवाड पत्रकार बाळासाहेब पांडे गजानन चौधरी एस एम मुदखेडकर तंटामुक्ती अध्यक्ष शाम पाटील ढगे माधव पाटील ढगे बालाजी मातावाड एन एम दंडेवाड गंगाधर पाटील ढगे केरबा पाटील सुगावे व्यंकटराव पाटील सुगावे संभाजी पाटील सुगावे केंद्रे बिनतारी संदेश घुंगराळा माधव सूर्यवंशी गुत्तेदार अविनाश पाटील पवार पाटील ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे खंडू पाटील ढगे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होतेयावेळी सुभाष गायकवाड म्हणाले की वसंत पाटील सुगावे यांना विकास करण्यासाठी ऊर्जा द्या यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणता येते घुंगराळा येथे आकरावी ते बारावी शाळेचा उल्लेख करत सदरची शाळा झाली पाहिजे असा वसंत पाटील सुगावे यांचा मानस असून जिल्हा परिषद शाळेचे महत्व वाटले पाहिजे शासकीय शाळा जपल्या पाहिजे सुभाष गायकवाड यांनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी पत्रकार बाळासाहेब पांडे म्हणाले की वसंत पाटील हे विकासाची दृष्टी असलेले व्यक्तिमत्व असल्याचे पांडे आपल्या भाषणात म्हणाले आहे
देवराज जयराज एजन्सीच्या वतीने सदरचे काम करण्यात येत आहे

0 Comments