Header Ads Widget

ग्रामीण भागातील पांदन रस्ते कधी करणार वाटेत दगड गोटे आणि झूडपे शेतकरी हैराण -

      मारोती इबितवार 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील म्हणजे इकळीमाळ येथील असलेल्या शिवारातील पांदण रस्त्यावर मोठ मोठे दगड गोटे झाडी झूडपे वाडली असताना सुद्धा शासन व ग्रामपंचायत याकडे का लक्ष देत नाहीत असा प्रश्न जनसामान्य शेतकऱ्यांना भेडसावत आहे

नांदेड जिल्हाच्या जिल्हाधिकाऱ्यासह नायगावचे तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जास्तीचे लक्ष देऊन पांदन रस्ते तात्काळ मार्गी लावणे गरजेचे असले तरी सदरचा पुढाकार सदरच्या ग्रामपंचायत व ग्रामसेवकानी घेऊन सदरची हाती घ्यावेत अशी मागणी जोर धरित आहे 

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत असून सदरचा रस्ता इकळीमाळ ते कुंटुर शिवाराना जोडणारा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर ९० ते १०० हेक्टर क्षेत्र असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी पांदन रस्ते चालू करावेत अशी मागणी होत आहे 

प्रशासनाने याची दखल घ्यावी व सदरचा पांदन रस्ता दुरुस्त करण्यात यावा गोविंदराव सोनटक्के, नागोराव सोनटक्के, संतोष शंकरराव पुयड,गोविंंद अप्पाराव पुयड, सुरेखा संजय पुयड आदी शेतकरी करीत आहेत

Post a Comment

0 Comments