नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सोमठाच्या समस्त गावकऱ्यांच्या एकीच्या बळामुळे सदरची निवडणूक बिनविरोध काढण्यात आली असल्यामुळे या गावच्या गावकऱ्यांच्या एकीचा विजय असल्याचे जनतेतून चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
सदरच्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका बऱ्याच पैकी गावात अटीतटीच्या होतात परंतु सोमठाणा येथे एकीच्या बळामुळे बिनविरोध करण्यात आली आहे
तालुक्यातील सोमठाणा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही गावकऱ्यांच्या विचारमय विचारातून सदरची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे
सदरच्या निवडणुकीत लागणारा पैसा व वेळ खर्च करण्यापेक्षा गावकऱ्यांच्या विचाराने सदरची सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीतील सोसायटी बिनविरोध काढल्यामुळे गावकऱ्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे सदरच्या निवडणुकीचे श्रेय समस्त गावकऱ्याला जात आहे
अशाच निवडणुका जर गावा गावात जर बिनविरोध निघाल्या तर भविष्यात गावकऱ्यांच्या एकीच्या बळाचा फायदा विकासाला चालणा देतो असा संदेश या निवडणूकीतुन दिसून येते सदरच्या निवडणुकीत सर्व गाव एकत्र येऊन महत्वाचा निर्णय घेतल्यामुळे सदरची निवडणूक बिनविरोध करण्यात आले आहे
सोमठाण्याची सदरची सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही अभिनंदनस्पद कामगिरी केली असल्याचे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे

0 Comments