नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील मौजे कार्ला खुर्द येथे प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या चाळीस वर्षाखाली पुनर्वसन झालेल्या गावाला अध्याप स्म्शान भूमी नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे
प्रशासनाने तात्काळ स्म्शानभूमी तात्काळ उपलब्ध करून द्यावे अन्यथा काही दुर्दैवी घटना घडल्यास थेट त्या प्रेताची अंत्यविधी बिलोलीच्या तहसील कार्यालयाच्या पटांगणात करणार असल्याचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात नव्हे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात सन १९८२-८३ च्या कार्यकाळातील अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे प्रशासनाने भविष्यात नागरिकाची काही जीवितहानी होऊ नये म्हणून पुनर्वसन केले परंतु आध्याप या गावांत स्म्शान भूमी उपलब्ध नसल्यामुळे व जागा नसल्याने कुठे अंत्यसंस्कार करावे लागत असताना सुद्धा प्रशासन झोपेचे सोंग घेऊन वेळ मारून नेत आहेत नायगाव तालुक्यासह अन्य तालुक्या बरोबर बिलोलीच्या मौजे कार्ला खु) हे एक गाव पुनर्वसीत असताना ही या गावाकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे
ग्रामीण भागात स्म्शानभूमी नसल्याचे चित्र स्पष्ट होते सदरच्या गावांत सर्व धर्माचे लोक नांदत असतात व लोकसंख्या ही मोठया प्रमाणात असल्यामुळे या गावात हक्काची स्म्शानभूमी देणे गरजेचे असल्यामुळे व भर पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रेताची अंत्ययात्रा घेऊन जावे लागत आहे
बिलोलीच्या तहसीलदाराना दिलेल्या निवेदनावर गंगाधर ईबितदार, गौतम गावंडे ता.अध्यक्ष, कपिल भेदेकर ता.महासचिव, भिमराव सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते, गौतम वाघमारे आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत

0 Comments