Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजची दखल : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृष्णुर व घुंगराळा येथे पुन्हा कार्यन्वित होणार - बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण - !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर व घुंगराळा विभागातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सदरच्या निर्मिती करण्यासाठी व कार्यन्वित करण्या संदर्भात दिनांक ३ मार्च २०२३ रोजी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन बातमी प्रकाशित करण्यात आली होती
त्या बातमीची तात्काळ दखल नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी सदरच्या दोन्ही बँका तात्काळ चालू करण्यात येथील अशी  ग्वाही दिली आहे

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी सदरच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कृष्णुर व घुंगराळा येथे परत कार्यान्वित करून दिल्यास शेतकऱ्यांची गैरसोय टळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावर टाकला होताशेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी ऑनलाइन बातमीची दखल घेत सदरच्या बॅंका पुन्हा कार्यन्वित करण्यासाठी सज्ज झाले आहेत 

नायगाव येथे जोडण्यात आलेली कृष्णुर व घुंगराळा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही परत सदरच्या शाखा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व हितासाठी मोठ्या जोमाने कार्यन्वित होणार असल्याची माहिती त्याचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या सूत्राने सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments