पंतप्रधान सन्मान योजनेच्या संदर्भामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याची दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी नायगाव फास्ट न्यूज च्या माध्यमातून ऑनलाईन बातमी प्रकाशित केली होती सदरच्या बातमीची दखल या विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन्मान योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे
राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अतिशय चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे व शेतकऱ्यांचा विश्वास ह्या बँकेवर बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या बँकेचा आर्थिक व्यवहार अतिशय सुरळीतपणे चालत असल्याने शेतकरी बांधव या जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवी ठेवत आहेत विम्याची रक्कम तात्काळ मिळते शासकीय अनुदान लवकर मिळत सदरील बँक अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे कर्जाची व्यवस्थित परत फेड करून घेणे व परत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे अशा पद्धतीच्या सुविधा जिल्हा मध्यवर्ती बँकेत मिळत असल्याने तमाम शेतकऱ्यांचा विश्वास ह्या बँकेवर बसला आहे
पंतप्रधान सन्मान योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांना मिळणारे दोन हजार रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत लेट लतीब सदरचे पैसे पडत असल्याची व तात्काळ पैसे जमा करण्यात यावे अशी बातमी नायगाव फास्ट न्यूज च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली होती
परंतु या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व यंत्रणेने तात्काळ बातमीची दखल घेत या बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments