नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपकार्यकारी अभियंता उपविभाग नायागांवच्या अंतर्गत नरसी कुंटूर मांजरम कृष्णुर असे एकूण चार विद्युत वितरण कंपनीचे मोठे युनिट आहेत या युनिट अंतर्गत गावांत विद्युत वितरण कंपनीचे कोठ्यावधी रुपये थकबाकी असल्याची माहिती मिळते तर लाखो रुपयाच्यावर चालू वसली असल्याचे सांगण्यात येत आहे
नायगाव उपकार्यकारी अभियंता उपविभागा अंतर्गत असलेले मोठया रक्कमे वसुली ही गेल्या अनेक वर्षा पासून असल्यामुळे वसुली करण्यासाठी आळस करणारे अधिकारी व कर्मचारी आज पर्यंत आले किती गेले किती यांचा आधाप अंदाजे लावणे शक्य नसले तरी कोठ्यावधी वसुली असल्यामुळेच गावा गावांत नागरिकांना सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेविद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी ग्राहकाना वाढीव बिले असल्यामुळे व ग्राहक भरले नसल्यामुळे एवढ्या मोठया प्रमाणात थक बाकी वाढली असल्याचे वास्तव चित्र दिसून येते दोन दिवस लाईट सुरळीत आणि एक एक महिना विस्कळीत अशी अवस्था विद्युत वितरण कंपनीची झाली असून सध्याच्या परिस्थितीत चालू बाकी लाखो रुपयाच्या वर असल्याचे समजते विद्युत वितरण कंपनी नफयात असो की घाट्यात लाईट द्यावीच लागणार आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अगोदरच घाट्यात असल्याचे सांगितल्या जाते परंतु वसुली ही केल्या जाते तर मग विद्युत पुरवठा सुरळीत का होत नाही असा प्रश्न जनतेतून विचारला असला तरी कोठ्यावधीची रुपयाच्या थक बाकी येणे व चालू बाकी लाखो रुपयाच्या वर असल्यामुळे विद्युत पुरवठा करणे ही विद्युत वितरण कंपनीला कठीण जात असल्याचे स्पष्ट चित्र असले तरी लाईट सुरळीत ठेवणे विद्युत वितरण कंपनीच्या व अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे

0 Comments