नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विचाराला अनुसरून आम्ही एका विचाराने काम करणारे राजकीय पुढारी आहोत असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले असून राजकारण करत असताना एका विचाराची लढाई असने गरजे आहे
राजकारण करत असताना त्या राजकारणाच्या माध्यमातून जनसामान्याची नाळ माझ्या राजकीय क्षेत्रात जपायला मिळाली असून राजकारण करणे म्हणजे धंदा नव्हे राजकारण करणे म्हणजे द्वेष भावना नव्हे राजकारण करणे म्हणजे एकमेकांना संपवणे नव्हे परंतु राजकारण करत असताना कुठेतरी समाजाचं देणं घेणं लागतो म्हणून राजकारणाचा छंद लागलेला असतो असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील घोटाळकर यांनी सांगितले आहे
राजकारणात असलेली लढाई विचाराची असली पाहिजे बे विचारी नको शेतकऱ्यांच्या वजन सामान्य माणसाच्या विचारातून दिली जाणारी ऊर्जा ही राजकीय पुढार्यांना एक वेगळा संदेश देऊन जाते आहे
तो म्हणजे आम्ही एका विचाराने शेतकऱ्यांचे प्रश्न असो की जनतेचे प्रश्न असो ते मार्गी लावण्यासाठी एकत्रितपणे विचाराच्या पलीकडे जाऊन विचार करणे व त्यातून निघणाऱ्या मार्गाने राजकारण करणे यापेक्षा राजकारणात दुसरा कोणता संदेश निर्माण होऊ शकत नाही असे ही मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले

0 Comments