नायगाव तालुक्यातील कुंटटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चार गावांत विना परवाना देशी दारू विक्री करीत असताना ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि महादेव पुरी यांच्या आदेशानुसार सावरखेड देगांव कृष्णूर बरबडा येथे कुंटूर पोलीसांनी धाड मारून अंदाजे आठ ते नऊ हजाराची देशी दारू पकडली आहे
तालुक्यातील कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी धुळीवंदनेच्या दिवसी शासनाच्या आदेशानुसार दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा विनापरवाना दारू विक्रेते आपला गोरख धंदा चालूच ठेवले आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असल्यामुळे दिनांक ७ मार्च २०२३ रोजी चार ठिकाणी दारू आल्यावर गाडी मारले आहेत
बरबडा येथील विनापरवाना देशी दारू आड्यावर सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय निकाते, ए एस आय पोले, जेमादार कंधारे, जेमादार कांबळे यांनी बरबडा व कृष्णूर येथे धाड मारली आहे
सावरखेड येथे ठाण्याचे फौजदार संजय अटकोरे यांच्यासह बिट जेमादार संतोष कुमरे पॉ.का. अशोक घुमे यांनी धाड मारली तर देगांव येथे बोट जेमादार गिते आणि पॉ. का व्ही व्ही ईश्वरे यांनी धाड मारली असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे माहिती ठाणे अमलदार पवार यांनी दिली आहे

0 Comments