नायगाव विधानसभा मतदार संघातील तहसील प्रशासनानी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या गोरगरीब योजना व लाभार्थ्यांसाठी मोफत घरकुलांचा लाभ कोण कोणत्या लाभार्थ्या पर्यंत गेला आणि किती लाभार्थी वंचित यासाठी बैठकीचे आयोजन महत्वाचे आहे
यांची माहिती जनसामान्य माणसा पर्यंत जाण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ अतिशय महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करावे असे मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी केली आहे
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मिळाले असले तरी अद्याप अनेक लाभार्थी लाभा पासून वंचित असल्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावर सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे असे शिवराज पाटील म्हणाले आहे
केंद्र सरकार कडून आलेल्या घरकुलांचा लाभ त्यांच्या पदरात पाडून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे असे ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा.शिवराज पाटील होटाळाकर यांनी सांगितले आहे
या तिन्ही तालुक्यांमध्ये गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाले असले तरी बऱ्याच पैकी गावातून घरकुलांचे कामे ही चालू करण्यात आले परंतु त्या घरकुलांचे हप्ते वेळोवेळी पडत नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत असली तरी शासना कडून मिळणारी दीन ते तीन ब्रास रेती ही त्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावे हा महत्वाचा मुद्दा आहे
तहसील प्रशासनासह पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सदरची महत्वपूर्ण बैठक लावून सदरचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असले तरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत ग्रामसेवका कडून सदरचे अहवाल मागूनही घ्यावेत असेही शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे

0 Comments